The Poop Book now introduced in Marathi audio!

/ / Announcements

Wonderful to see The Poop Book introduced in Marathi – do watch this 5-minute YouTube video with its clear and fun narration, made by Nisargabhaan, an environmental group based in Nasik. Link: https://www.youtube.com/watch?v=iZ9g48P9gLI&t=89s

सृष्टी पुस्तक परिचयमाला | The Poop Book | Kalpavriksh India

निसर्ग व पर्यावरण या साहित्य प्रकारातल्या सामान्यतः दुर्लक्षित विषयाची ओळख वाचकांना व्हावी यासाठी अशा पुस्तकांचा परिचय करून देणारा निसर्गभान चा “सृष्टी पुस्तक परिचयमाला” हा उपक्रम आहे. या पुस्तक परिचयमालेद्वारे कीटक, प्राणी, पक्षी, जलचर, सरीसुर्प, वृक्ष अशा निसर्गातील अद्भुत गणगोतांची जशी ओळख करून दिली जाते तशीच पर्यावरण, मनुष्य आणि निसर्ग यातील अंतरसंबंध उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकांचाही या मालेमध्ये समावेश केला गेला आहे. अशा विस्तृत पटात गुंफल्या जात असलेल्या या पुस्तक परिचयमालेचे एक आवर्तन पूर्ण झाले असतांना या भागापासून आता थोडा बदल केला गेला आहे. ज्या बालदोस्तांच्या व युवा पिढीच्या हाती आपण आपली वसुंधरा सोपवणार आहोत त्यांना विविधतेने नटलेल्या या अद्भुत विश्वाची ओळख करून देण्यासाठी या मालेमध्ये यापुढे कधी गोष्टीरूपाने तर कधी माहितीपूर्ण पुस्तकांमधून भेटणाऱ्या निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख आता दर महिन्याला करून दिली जाणार आहे. सृष्टीतील विविध घटकांविषयी उलगडणाऱ्या या नात्यातून न जाणो कदाचित आपल्याला आज भेडसावणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांच्या विळख्यातून सुटण्याचा मार्गही गवसेल…टीम निसर्गभान